आज भारत पाकिस्तान हाईवोल्टेज सामना
विश्वचषक २०२३ स्पर्धेतील सर्वात मोठा सामना आज होत आहे. स्पर्धेतील १२ व्या सामन्यात आज भारत व पाकिस्तान एकमेकांशी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे भिडणार आहेत.हा सामना दुपारी सुरू होणार आहे.दोन्ही संघाच्या आतापर्यंतचा प्रवास पाहता बाबर आझम च्या नेतृत्वात पाकिस्तानने त्यांच्या आधीच्या दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला आहे.या आधी झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान ने ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता.भारताचा विचार करता भारताने देखील रोहित शर्माच्या नेतृत्वात त्यांच्या दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला आहे.या आधी झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तान विरुद्ध मोठ्या धावसंखेचा सहज पाठलाग करत विजय प्राप्त केला होता.त्यामुळे आज होणाऱ्या हायवोल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार हे पहावे लागणार आहे.