रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (दि.29), रविवार (दि.30) व सोमवार (दि.31) रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार.

मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (दि.29), रविवार (दि.30) व सोमवार (दि.31) रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला वेग देण्यात आला आहे.

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी तसेच पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 36 हजार 459 वीज ग्राहकांकडे 5 कोटी 14 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 11 हजार 636 वीज ग्राहकांकडे 1 कोटी 82 लाख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 हजार 823 वीज ग्राहकांकडे 3 कोटी 32 लाख रुपयांची थकबाकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button