चिपळुणात दुचाकीची चोरी, एकावर गुन्हा
मालकाच्या संमत्तीशिवाय दुचाकी चोरणार्या एकावर बुधवारी चिपळूण येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गणपत जगताप (३१, मोरगांव-पुणे) असे त्याचे नाव आहे. याची फिर्याद सुनील भागुरा सावर्डेकर यांनी दिली. राहुल हा सावर्डेकर यांच्या बोलेरो पिकअप गाडीवर महिनाभरापासून चालक होता. असे असताना त्याने त्यांची दुचाकी चोरली. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com