कुवारबांवमधील ते अतिक्रमण जमीनदोस्त
गेल्या अनेक वर्षापासून नजिकच्या कुवारबांवमधील शासकीय जागेवर अतिक्रम केल्याचे प्रकरण थंडावले होते. मात्र आता अखेरीस हे प्रकरण संपले आहे. बुधवारी सायंकाळी रत्नागिरीच्या तहसीलदारांनी केलेल्या धडक कारवाईत २ जेसीबीच्या सहाय्याने शासकीय जागेवर बांधलेला स्टेज वजा चौथरा पाडून जमीनदोस्त करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या आधी कुवारबांव येथील नंदकिशोर चव्हाण यांनी सक्षम प्राधिकार्याची परवानगी न घेता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० (३) चा भंग करून अतिक्रमण केले असल्याचे पत्र पाठवण्यात आले होते. १२ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार ते ८ दिवसांच्या आत काढून टाकावे असे सांगण्यात आले होते. यानंतर सुधारित आदेशानुसार १९ मे २०२३ व २४ मे २०२३ रोजीच्या आदेशानुसार ३१ मे २०२३ रोजी अतिक्रण हटविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र इतक्या आदेशानंतरही अतिक्रमण केलेल्या जागेवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इतकेच नाही तर याच जागेवर विविध सणानिमित्त कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत होते. www.konkantoday.com