
लांजा तालुक्यातील लांजा शहरामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ‘होऊ द्या चर्चा’ या अभियान संपन्न…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सध्या महाराष्ट्र राज्य भर ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत असून. त्यानुसार आज शिवसेना लांजा तालुक्यातर्फे ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन लांजा शहरामध्ये करण्यात आले होते. यावेळी निरीक्षक गुरुनाथ खोत व जिल्हाप्रमुख विलास चाळके ह्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा पार पडली त्यावेळी त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक आश्वासने दिलीत. शिवस्मारक समुद्रात बांधणे, दाऊदला अटक करणे, गंगा स्वच्छ करणे, स्मार्टसिटी, कश्मिरी पंडितांना माघारी आणणे, मराठा, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव या आश्वासनांचे काय नरेंद्र मोदी यांनी तर पंतप्रधान होण्यापूर्वी दरवर्षी देशात दोन करोड नोकऱ्या निर्माण करण्याचे व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ही सर्व आश्वासने हवेतच विरली आहेत. राज्य सरकारच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. या असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात देश, राज्यभरातील विविध समस्या, सरकारचे अपयश याविषयी चर्चा झाली. तसेच संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा झाली. त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख नागेश कुरूप, महिला तालुका संघटक लीला घडशी, युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राहुल शिंदे, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, युवती तालुका अधिकारी दिपाली दळवी, महिला शहर संघटक छाया गांगण, शहर सचिव सचिन लिंगायत, खरेदी विक्री संघाचे चेअरमन परवेश घारे, शिवसहकार तालुका संघटक संजय पाटोळे, ग्राहक संरक्षण कक्ष शहर संघटक तुषार लांजेकर, विभाग संघटक रवींद्र डोळस, मंगेश उर्फ पप्पू मुळ्ये, नितीन शेट्ये, वैभव जोईल व शाखाप्रमुख, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसहकार सेना अंगीकृत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com