रत्नागिरी नगर परिषदेला कोणी वाली नाही आधी लोकप्रतिनिधी आणि आता प्रशासन,त्या जॅकवेलचे स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नव्हते
काही दिवसांपूर्वी जॅकवेल कोसळली अन अख्ख्या शहराचा जीव टांगणीला लागला. आता या बाबत खुद्द न.प. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी जॅकवेल सुरू झाल्यापासून स्ट्रक्चरल ऑडिटच झालेले नसल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.
शीळ धरणातील जॅकवेल कोसळली व शहरवासियांचा पाणीपुरवठा बंद झाला. आधीच शहरात अस्तित्वात असलेली नवीन पाणीपुरवठघ योजना जगविख्यात आहे. ठिकठिकाणी फुटत असलेल्या या पाईप लाईनवर आजमितीस कायमस्वरूपी उपाय रत्नागिरी नगर परिषदेला सापडला नाही. त्यामुळे शहरातील रस्ता वाहतुकीसाठी कमीच व खोदाईसाठी जास्त वापरला गेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे कमी की काय, त्यात ऐन गणेशोत्सवात आणखी एका समस्येची भर पडली. शीळ धरणातील जॅकवेल कोसळली. यामुळे शहराचा पाणीपुरवठा बाधित झाला. अनेक नागरिकांनी या बाबत तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय राजकीय पक्षांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र असे असतानाही या जॅकवेलचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले का नाही, असा सवाल काही राजकीय व्यक्तींनी उपस्थित केला आणि सार्यांच्याच भुवया उंचावल्या. www.konkantoday.com