
चिपळुणात खेर्डी येथे रेल्वेच्या धडकेने तरूणाचा मृत्यू.
रेल्वेगाडीची धडक बसून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी तालुक्यातील खेर्डी येथे घडली. या प्रकरणी शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ओंकार इरान्ना पाटील (१८, दातेवाडी-खेर्डी, मूळ-विजापूर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ रोजी सकाळी १०.१५ वाजता मुंबईकडून मडगावच्या दिशेने जाणारी गरीबच या रेल्वेगाडीची ओंकार याला धडक बसली यातच त्याचा मृत्यू झाला.www.konkantoday.com