
खेड शहरात ऑगस्ट महिन्यात अक्षरशः थैमान घातलेल्या डेंग्यूच्या साथीने पुन्हा डोके वर काढले
खेड शहरात ऑगस्ट महिन्यात अक्षरशः थैमान घातलेल्या डेंग्यूच्या साथीने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिक पुरते हतबल झाले आहेत. एकीकडे डेंग्यूची साथ वेगाने फैलावत असताना दुसरीकडे मात्र तालुका आरोग्य विभागासह नगर प्रशासनाची यंत्रणा कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहेत. दिवसागणिक डेंग्यूसदृश्य रूग्णांची संख्या वाढत असुन हे रूग्ण खासगी रूग्णालयामध्येच उपचार घेत असल्याने आकडेवारी समोर येताना दिसत नाही. सद्यस्थितीत केवळ तीनच डेंग्यूसदृश्य रूग्ण सक्रीय असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. डोअर टू डोअर सर्वेक्षणाची मोहीमही सुरू असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. जुलै महिन्यातील पूरस्थितीनंतर शहरात विविध साथींच्या आजारांनी डोके वर काढले होते.
www.konkantoday.com