विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार आंदोलन करणार
महावितरणमधील तांत्रिक कामगारांच्या हक्कासाठी कायम लढणार्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनकडून राज्यभरात क्रमबद्ध आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यालय पातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील अंमलबजावणी बाकी असलेल्या प्रश्नांसाठी व आवश्यक मटेरियलसाठी हे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. www.konkantoday.com