राजेस्थान विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल
निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार राजस्थान विधानसभेच्या निवडणुका 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबरला होणार आहेत.एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून ३ डिसेंबरला निकाल लागणार आहेत. 23 नोव्हेंबर दिवशी जास्त प्रमाणात असणारे विवाह सोहळे आणि “सामाजिक व्यस्तता” याचा विचार करून, मतदान पॅनेलने सांगितले की ते तारखेत सुधारणा करत आहेत. सोमवारी, मतदान पॅनेलने 23 नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस म्हणून घोषित केला होता.