पूररेषा निर्बंध शिथिलतेसाठी शासन सकारात्मक, पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
चिपळूण शहरावरील जाचक पूररेषेचा विषय गंभीर आहे. त्या अनुषंगाने पूररेषेचे निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारही सकारात्मक आहे. यासंदर्भात कायदे तज्ञ व तांत्रिक तज्ञ यांच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूण शहराचा प्रलंबित विकास आराखडा योजनेतील दुरूस्ती व सुधारित योजनेला नुकतीच मंजुरी दिली. सदर योजना मंजूर होण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांनी पुढाकार घेत राज्य शासनाकडे पर्यायाने मुख्यमंत्री यांच्याकडे सदरची योजना मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले. तसेच सदर योजना मंजूर होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सुद्धा सहकार्य लाभले. याबद्दल चिपळूण क्रेडाईच्यावतीने पालकमंत्री सामंत यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
www.konkantoday.com