
३४ जिल्ह्यांत सुपर स्पेशालिटी रुग्णालये; मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या दुरवस्थेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई वगळता सर्व 34 जिल्ह्यांत सुसज्ज सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे.आरोग्य विभागातील रिक्त पदेही तातडीने भरली जाणार आहेत. सर्व रुग्णालयांत तातडीने गरजेनुसार औषधे खरेदी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. येत्या पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या जोडीने राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांनी युक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी सोमवारी दिले.
वर्ष 2035 पर्यंत आरोग्य यंत्रणा सुधारताना वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी एक आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे निर्देशही दिले. राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
www.konkantoday.com