
मान्सूनचे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रस्थान
मान्सूनने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रस्थान केल्याची घोषणा हवामान विभागाने केली. यंदा तो दरवर्षी पेक्षा दोन आठवडे आधीच राज्यातून दक्षिण भारताकडे गेला आहे.यंदा राज्यातून 5 ऑक्टोबर रोजी मान्सून उत्तर महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला. जसा तो येताना रेंगाळतो तसा जातानाही रेंगाळतो. त्यामुळे राज्यातून जाताना 20 ते 25 ऑक्टोबर ही तारीख उजाडते.
मात्र, यंदा त्याच्या परतीचा प्रवास वेगाने झाला. शिवाय जाताना तो बरसला नाही. 5 ऑक्टोबर रोजी सुरुवात होऊन 9 ऑक्टोबरला मान्सून राज्याबाहेर पडला. यंदा मान्सून राज्यातून 10 ते 12 ऑक्टोबर रोजी जाईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र, तो त्याहीपेक्षा दोन ते तीन दिवस आधीच राज्यातून गेला आहे
www.konkantoday.com