पिंपरी-चिंचवड परिसरातील कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिक,११ जण त्रास झाल्याने रुग्णालयात
पिंपरी-चिंचवड परिसरातील कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिके झाल्याची धक्कादायक घटना घडली. जलतरण तलावात आज सकाळी २२ नागरिक पोहण्यासाठी आले असता तलावात अचानक क्लोरीन गॅस लिक झाला, यामुळे 20 ते 22 जणांना श्वास घेण्याचा त्रास झाला आहे.कासारवाडी येथे असलेल्या महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिके झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या व्यक्तींना श्वास घेण्याचा त्रास झाला. काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. पोहण्यासाठी २२ जण आले होते. यापैकी ११ जणांना त्रास झाल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तसेच परिसरात क्लोरीन गॅस पसरल्यामुळे काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामुळे कासारवाडी येथील जलतरण तलावाच्या जवळची वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल तसेच पोलीस दाखल झाले
www.konkantoday.com