
राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला ,तिन पर्यटक बेशुद्ध
पुण्याजवळीत भोर येथे असलेलल्या राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. 30 ते 35 जणांना मधमाशांनी चावा घेतला. यापैकी तिन पर्यटक बेशुद्ध अवस्थेत होते.जखमींवर वेल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे. एका अति उत्साही पर्यटकांनी मारलेल्या सुगंधित परफ्युममुळे मधमाशांचे पोळ उठलं. अचानक मधमाशांच्या टोळक्याने हल्ला केल्याने पर्यटक गोंधळले. पर्यटकांची पळापळ झाली. किल्ल्यावरील इतर पर्यटकांनाही माशा चावल्या आहेत. यात माशा चावून जखमींची संख्या वाढण्याची ही शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रविार सुट्टी असल्याने अनेक पर्यटक राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते.
www.konkantoday.com