कमी पटसंख्येच्या शाळांची होणार समूह शाळा
खाजगी पद्धतीने देणगीदारांनी शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाला चौफेर टीका होत असतानाच अशातच शासनाने समूह शाळा योजनेचा निर्णय घेतला आहे. कमी पटसंख्येच्या शाळांचे रूपातर समूह शाळात होणार असून असे झाल्यास निश्चित गाव तेथे शाळा ही संकल्पना पुसली जाणार आहे. तालुक्याचा विचार करत तब्बल ८९ शाळा या कमी पटसंख्येच्या आहेत.
प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात रहावे यासाठी भौगोलिक क्षेत्र लक्षात घेवून शासनाने गाव तेथे शाळा या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळा उभारण्यात आल्या. निश्चित प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना याचा शैक्षणिकदृष्ट्या फायदा झाला आहे. एकावेळी शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा, शाळा खाजगी शाळांच्या तुलनेत पटसंख्याअभावी ओस पडू लागल्या आहेत. पटसंख्याचे वास्तव चित्र असतानाच दुसरीकडे खासगी पद्धतीने देणगीदारांनी शाळा दत्तक देण्याच्या निर्णय शासनापुढे आणल्याने त्यास टीका होत आहे. असे असतानाच वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून त्यांचे समूह शाळात रूपांतर करण्याची योजना शासनाने निश्चित केली आहे.
www.konkantoday.com