फाटक हायस्कूलची तपस्या बोरकर ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ जिल्हास्तरीय स्पर्धेची विजेती
रत्नागिरी : प्रतिनिधी
भारत शिक्षण मंडळातर्फे गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन स्मृती ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाली. यात 6 वी ते 8 वी च्या गटात रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या तपस्या बोरकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत सुमारे 20 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. ‘हा देश माझा, मी देशाचा’ या विषयावर तपस्याने प्रभावीपणे आपले मत मांडत प्रथम क्रमांक पटकावला. तपस्याला तिचे वडील अॅड. गुरूप्रसाद बोरकर, आई स्वरांगी बोरकर, प्रदीप तेंडुलकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल दि न्यू एज्युकेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक भास्कर झारे, पर्यवेक्षक विश्वेश जोशी, सचिव दिलीप भातडे, वर्गशिक्षिका निवेदिता कोपरकर यांनी तपस्याचे अभिनंदन केले.
www.konkantoday.com