रहाटाघर बसस्थानकातील कोसळलेल्या भिंतीकडे दुर्लक्ष
रत्नागिरी शहरातील बसस्थानक येथील संरक्षक भिंत कोसळून अनेक महिने लोटले तरी परिस्थिती जैसे थेच राहिली आहे. यामुळे बसस्थानकात येणारे प्रवासी व गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झघला आहे. त्यातच भिंत पडलेल्या ठिकाणाहून उनाड गुरे, कुत्री व रहिवासी इमारतीच्या आवारात जात असल्याने परिसरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. मात्र दिवसेंदिवस दुरवस्था वाढत चाललेल्या या बसस्थानकाकडे प्रवाशांकडून कानाडोळा केला जात आहे.
शहर वाहतुकीसाठी रहाटाघर येेथे बसस्थानक उभारण्यात आले. त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील व लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा एकदा रहाटाघर बसस्थानकातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अनेक वर्ष वापरात नसल्याने या बसस्थानकाची दुरवस्था सुरू झाल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
www.konkantoday.com