
कोकण रेल्वेमार्गावर १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता जनजागृती मोहीम साजरी
कोकण रेल्वेमार्गावर १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रेल्वेस्थानके स्वच्छ करणे, प्रवाशांना स्वच्छ पाणी, चांगले अन्न यावर भर दिला गेला. यासाठी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी पाहणी करून स्वच्छतेचा संदेश प्रवाशांना देण्यात आला आहे.
ही स्वच्छतामोहीम राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ आणि हरित रेल्वे यावर भर देणारी होती. कोकण रेल्वेवरील स्वच्छता आठवड्याची सुरवात कोकण रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन केली. यामध्ये स्वच्छ संवादांतर्गत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्व या विषयावर स्थानकांवर नाटक, प्रभातफेरी असे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते. रेल्वे कार्यालय, रेल्वे स्थानके आणि परिसर, पॅन्ट्री कार, रेल्वे वसाहती, डेपो, लॉबी, आरोग्य युनिट इत्यादींमध्ये साफसफाई करण्यात आली. स्वच्छ परिसर ठेवण्यासाठी रेल्वे वसाहती, डेपो, येथे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छतामोहीम हाती घेतली. स्वच्छ आहारांतर्गत कोकण रेल्वेवरील सर्व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विश्रामगृहे, रनिंग रूम इत्यादी ठिकाणी स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. सर्व केटरिंग स्टॉल्स, बेस किचन आणि पॅन्ट्री कार्सची तपासणी रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आली जेणेकरून प्रवाशांना दिले जाणारे अन्न स्वच्छ वातावरणात तयार केले जाईल आणि कचरा, स्वयंपाकघर आणि कॅटरिंग वेस्टची विल्हेवाट लावण्यावर भर दिला जाणार आहे.
www.konkantoday.com