
महाड औद्योगिक वसाहतीच्या विस्तारित वसाहती मधील प्रसोल केमिकल कंपनीमध्ये वायुगळती, एकाचा मृत्यू
महाड औद्योगिक वसाहतीच्या विस्तारित वसाहती मधील प्रसोल केमिकल या कंपनीमध्ये आज (दि.५) सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास गॅस गळती झाल्याने पाच कामगार बेशुद्ध पडले.त्यांना तातडीने महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
संतोष मोरे या कामगाराला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य तिघांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. इंद्रजीत पाटील (वय ३५), प्रवेश ठाकूर (वय २३) व पंकज डोळस (वय २७) या तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
प्रसोल कंपनीत मागील वर्षभरात दोन ते तीन अपघातांमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाले असून स्थानिक ग्रामस्थांनी सदरचा कारखाना महाड मधून कायमस्वरूपी हलवावा, अशी मागणी यापूर्वी लावून धरली होती
www.konkantoday.com