कत्तलीसाठी अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना संगमेश्वर पोलिसांनी पकडले


कत्तलीसाठी अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना संगमेश्वर पोलिसांनी पकडले असून पाच बैल आणि टेम्पो संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
अमोल आकाराम कांबळे वय 38 आणि अक्षय शामराव पाटील व 24 वर्षे राहणार सावर्डे खुर्द तालुका शाहूवाडी हे दोघे त्यांच्या ताब्यातील 407 टाटा टेम्पो नंबर एम एच 09 ई एम 1654 मध्ये पाच बैल गाडीच्या हौद्या मध्ये दाटीवाटीने कमी जागेत दोरीने बांधून जनावरे वाहतुकीचा कोणताही परवा नसताना गैर कायदा कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहकारी पोलीस किशोर जोयशी, सचिन कामेरकर, विनय मनवळ, गणेश बिक्कड चालक सिद्धेश अंब्रे, रोहित पाटील आदि सह सापळा रचून गुरुवारी सकाळच्या दरम्यान संगमेश्वर ते देवरुख जाणाऱ्या रोडवरील लोवले सीमेची वाडी या ठिकाणी पकडले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button