राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार येणार असल्याची चाहूल लागली म्हणून उद्योजक किरण सामंतठाकरे गटात येणार- आमदार वैभव नाईक यांचा दावा
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत हे चतुर उद्योगपती आहेत, राजकीय पदाधिकारी आहेत. पहिले ते राष्ट्रवादीत होते, नंतर त्यांना चाहूल लागली की शिवसेनेची सत्ता येणार म्हणून ते शिवसेनेत आलेआता ते शिंदे गटात आहेत, पण आता त्यांना राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार येणार असल्याची चाहूल लागली, त्यामुळे ते ठाकरे गटात येणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला.
कुडाळ येथे ‘होऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम झाल्यानंतर आ. नाईक यांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी नाईक म्हणाले की, कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांना राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पडलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने ‘होऊ द्या चर्चा’या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सत्ताधार्यांनी चाय पे चर्चा करून लोकांना खोटी आश्वासने दिली होती. त्यात सर्वसामान्य जनता सुद्धा फसली, आम्ही ही फसलो. आज महागाई, पेट्रोल- डिझेल दरवाढ, आरोग्य, बेरोजगारी हे जनतेचे प्रश्न आहेत. त्याकडे कोण पाहणार? असा सवाल यावेळी आ. नाईक यांनी उपस्थित केला.
www.konkantoday.com