महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने रत्नागिरीत आक्रोश मोर्चा काढला.
शिक्षक व सर्व कर्मचारी यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा, दत्तक शाळा योजना तात्काळ बंद करा, अशा मागण्यांसाठी कालमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने रत्नागिरीत आक्रोश मोर्चा काढला.माळनाका येथून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. रदद करा, रदद करा खासगीकरण रदद करा, जुनी पेन्शन योजना लागू करा अशा जोरदार घोषणा यावेळी शिक्षकांनी दिल्या. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये शिक्षकांनी आपल्या विविध मागण्या मागितल्या आहेत. त्यामध्ये शिक्षक व सर्व कर्मचारी यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करा, दत्तक शाळा योजना तात्काळ रदद करा, कंत्राटीकरणाचा शासन आदेश रदद करा, कमी पटाच्या शाळा एकत्रीकरण करण्याचा शासन आदेश रदद करा, शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे तात्काळ रदद करा, ऑनलाईन माहितीचा भडिमार तत्काळ थांबवावा, शिक्षकांना पूर्णवेळ शाळेत थांबून ज्ञानदानाचे काम करायला द्यावे, शिक्षण विभागाला आवश्यक ते अनुदान तात्काळ द्यावे. शिक्षकांची मुख्यालयाची अट रदद करावी. एमएससीआयटीची अट रदद करावी. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सहाय्यक उपकरणासाठी आवश्यक अनुदान तात्काळ मंजूर करावे आदी मागण्या करण्यात आल्या
www.konkantoday.com