सिंधुदुर्ग जिल्ह्यात फ्लॅटच्या भाड्यावरून वाद , तरुणाला बेदम मारहाण, बेशुद्ध झालेल्या तरुणाला मृत समजून फेकून दिले


सिंधुदुर्ग जिल्ह्यात धक्कादायक अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. फ्लॅटच्या भाड्यावरून कुडाळ तालुक्यातील एका 22 वर्षीय युवकाला कारमध्ये बसवून अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण करून त्याचा मृत्यू झाला असं समजून नदीत फेकून देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.सिद्धेश प्रमोद गावडे (२२) असं या मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान या सगळ्या धक्कादायक प्रकरणात संशयित किशोर वरक याच्यासह झोरे आणि गवस यांची पूर्ण नाव अजून समजलेली नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी मधलीवाडी येथील असलेला सिद्धेश प्रमोद गावडे (२२) या तरुणाला फ्लॅटच्या भाड्यावरून काही इसमाने कार मध्ये बसवले व हीकार जंगलात नेण्यात आली. गोवेरीमार्गे खानोली येथील जंगलात नेऊन झाडाला बांधून या युक्काच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून दांड्याने व लाथाबुक्क्यांनी अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. तुला कसले पैसे हवेत बोल असं म्हणत तुझा विषय आता कायमचा संपवतो असं म्हणत या नराधमांनी त्याला मारहाण केली त्याच्या मानेवर लाथ मारली या मारहाणीत हा युवक बेशुद्ध पडला इतकंच नाही तर सिद्धेश याचा मृत्यू झाला आहे असं समजून त्याला बांधा येथील मुंबई गोवा महामार्गाजवळील नदीत टाकण्यात आले.

बुधवारी सकाळी सिद्धेश शुद्धीवर आल्यावर आपण एका नदीपात्र परिसरात असल्याचे त्याने पाहिले. परिसरातील ग्रामस्थांना सिद्धेशने मदतीसाठी हाक मारली. बांधा येथील ग्रामसंधी त्याला मदत करत या सगळ्याची माहिती तात्काळ बांदा पोलिसांना दिली. मदतीसाठी हाक मारल, बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

या सगळ्या धक्कादायक व संतापजनक प्रकरणात तीनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button