रूट कॅनाल तज्ञ डॉ.क्षितिज जोशी यांचे लक्षणीय यश :-
इंडियन ऐन्डोडॉटिक्स सोसायटीच्या ३० सप्टेंबर २०२३रोजी भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय दंत वैद्यक परिषदेमध्ये डॉ. क्षितिज जोशी यांनी सादर केलेल्या रूट कॅनॉल ट्रीटमेंट संबंधित केसला जुरी अवॉर्ड मधे तृतीय पुरस्कार प्राप्त झाला.हा पुरस्कार त्यांना जपानचे प्रोफेसर डॉ. योशी टेराऊची व इटलीचे प्रोफेसर डॉ.अर्नाल्डो कॅस्तेलुसी ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ह्या परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून पहिल्या दहा केसेस मधे त्यांच्या केस ची निवड करण्यात आली होती. त्यातून त्यांनी केलेल्या केस सादरीकरणाला तृतीय क्रमांकाचा हा महत्वाचा पुरस्कार प्राप्त झाला तसेच ऑनलाईन परिक्षणातही आपणा सर्वांच्या पाठिंब्यावर त्यांनी तृतीय क्रमांक मिळविला. रत्नागिरीतील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ समीर व डॉ. सौ रत्ना जोशी यांचे डॉ.क्षितिज हे सुपुत्र असून ते रूट कॅनॉल तज्ज्ञ म्हणून रत्नागिरी येथे गेली सुमारे पाच वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत.रत्नागिरीसारख्या शहरात दंत व्यवसाय करत असून सुद्धा संपूर्ण भारतातून निवडलेल्या दहा केस मधून त्यांनी सादरीकरण केलेल्या केसला तिसरा क्रमांक प्राप्त होणे हे महत्वाचे मानले जाते. विशेष म्हणजे त्यांनी परिक्षकांसमोर सादर केलेल्या केसची आतापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद दंत साहित्यात सापडलेली नाही.
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com