राजस्थानमध्ये उदयपूर-जयपूर मार्गावर धावणाऱया वंदे भारतट्रेनलाघातपात करण्याचा कट लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे उधळला


देशातील सेमी हायस्पीड ट्रेन अशी ओळख असलेल्या वंदे भारत ट्रेनला
घातपात करण्याचा कट
लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे उधळला गेला आहे. राजस्थानमध्ये उदयपूर-जयपूर मार्गावर धावणाऱया वंदे भारत ट्रेन जात असलेल्या रुळावर ठिकठिकाणी दगड, लोखंडी रॉड ठेवले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.रुळावरील दगड अचानकपणे दिसल्याने लोकोपायलटने तत्काळ गाडीचा आपतकालीन ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांनी प्रवास करणाऱया प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आलेली जयपूर-उदयपूर वंदे भारत ट्रेन समाज पंटकांच्या निशाण्यावर आली आहे. वेगात धावत असलेली गाडी रुळावरून घसरून भीषण अपघात व्हावा म्हणून वंदे भारत ट्रेन येण्याआधी रुळावर दगड आणि लोखंडी रॉड ठेवल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. सदरचे दगड दिसल्याने लोको पायलटने तत्काळ गाडी थांबवल्याने अनर्थ टळला आहे. रुळावरील दगड आणि लोखंडी काढल्यानंतर गाडी पुढे गेली. दरम्यान रेल्वेकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र उत्तर पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने यासंदर्भात तपास करून कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button