रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथेकिरकोळ वादातून तरूणाला मारहाण

0
95

रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे किरकोळ वादातून तरूणाला पाच ते सहाजणांनी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आही. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्ररणी शहर पोलिसांकडून ६ संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला. विराज शेखर कुमठेकर (२५, रा. कोकणनगर, रत्नागिरी) व त्याचे अन्य ५ साथीदार आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे बहिणीचे पती मुंबईवरून येणार असल्याने रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास बहिणीच्या पतीला घरी घेवून येत असताना त्यांचा जयस्तंभ येथे विराज कुमठेकर याच्याशी वाद झाला. या रागातून विराज व त्याच्या सोबत असलेल्या ५ जणांनी तक्रारदार यांना हाताच्या थापटाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी विराज व त्याच्या साथीदाराविरूद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here