गांधी जयंतीनिमित्त रविवारी शहरातील १४ प्रभागांमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ७ टन ५३५ किलो कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत प्रशासकीय अधिकार्यांसह तब्बल १ हजार ९२० जणांनी सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या सुचनेनुसार प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेेंद्रकुमार राजमाने, तहसिलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये नगर परिषद, स्वयंसेवी संस्था, डी.बी.जे. माविद्यालय, परांजपे मोतीवाले हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, युनायटेड हायस्कूल, आनंदराव पवार महाविद्यालय, खतीजा हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल पाग, एनएसएसचे विद्यार्थी, एन.सी.सी. ग्रुप, नाम फाऊंडेशन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, लायन्स क्लब, रोटरी क्लब, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, श्री सदस्य, नागरिक, लोकप्रतिनिधी सहभागे झघले. या सर्वांनी संपूर्ण शहर चकाचक केले. त्यांनी गोळा केलेला कचरा घंटागाड्यातून कचरा प्रकल्पात नेण्यात आला. www.konkantoday.com