गगनबावडा घाटात  टेम्पो थेट संरक्षक कठडा तोडून दरीकडे झुकला व कठड्यावर अडकून हेलकावे देत राहिला, घाटातील थरार


वैभववाडीमार्गे कोल्हापूरच्या दिशेने जाणार्‍या टेम्पो चालकाला गगनबावडा घाटातील अवघड वळणाचा अंदाज न आल्याने  टेम्पो थेट संरक्षक कठडा तोडून दरीकडे झुकला व कठड्यावर अडकून हेलकावे देत राहिला. या टेम्पोमधील चालक व क्लीनरचा जीव धोक्यात असताना इतर वाहनधारकांनी तात्काळ मदतकार्य राबवून त्या दोघांना वाचवले. ही घटना रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. मात्र या घटनेची नोंद पोलीस स्थानकात नव्हती.
वैभववाडी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायं. ६.३० च्या सुमारास एक रिकामा टेम्पो गगनबावडा घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. पाऊस असल्याने घाटात धुके होते. चालकाला गगनबावडा घाटात अवघड वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो थेट संरक्ष कठडा तोडून दगडांवर स्थिरावत दरीच्या दिशेने  हेलकावे खात होता. प्रथम चालक व क्लीनरला टेम्पोतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर एका ट्रकला दोरखंड बांधून हा टेम्पो सुरक्षितरित्या रस्त्यावर आणण्यात आला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button