सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ वादळी वाऱ्यामुळे समुद्रात भरकटलेल्या मासेमारी नौकेला पाजपंढरीमधील मासेमारी नौकेने वाचवल्याने दुर्घटना टळली


सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ वादळी वाऱ्यामुळे समुद्रात भरकटलेल्या मासेमारी नौकेला पाजपंढरीमधील मासेमारी नौकेने वाचवल्याने दुर्घटना टळली आहे
कालपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यावर या वादळात काल संध्याकाळी सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ भरकटलेली एका मासेमारी नौकेला पाजपंढरीमधील दुसऱ्या एका मासेमारी नौकेने वाचवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.आता या नौकेवरचे खलाशी व नौका सुखरूप आहेत.
काल हवामान खात्याचा दोन दिवस ऑरेंज अलर्ट आल्यावर मच्छीमारांनी शांत बसण्याचा निर्णय घेतला.
त्यातच मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांची धावपळ उडाली. काहींनी दाभोळ खाडीचा आधार घेतला तर काहीजण आंजर्ले खाडीत येत होते त काल संध्याकाळच्या वेळेस हर्णै जेटीबाग येथील वामन रघुवीर यांच्या मासेमारी नौकेने किल्ल्याचा आधार घेतला होता.
परंतु संध्याकाळी वादळी वारे जोरदार सुटू लागले. त्याचवेळेस या नौकेचा नांगराचा दोरच तुटला आणि नौका लाटांच्या तडाख्याने भरकटल्या सारखी अवस्था निर्माण झाली. ही नौका भरकटत जाऊन सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ अडकली.
मदतीसाठी कोणाला साद घालायची असा प्रश्न त्या नौकेतील खलाश्यांना पडला होता. कारण काल त्यावेळेस ही एकच नौका त्याठिकाणी होती. मुसळधार पाऊस , सोसाट्याचा वारा अश्या वातावरणात मोठा प्रश्नच निर्माण झाला होता.
रात्रभर ही नौका त्याच ठिकाणी होती. सर्व खलाशांनी जीव मुठीत घेऊन रात्र किल्ल्याजवळच काढली. कारण वातावरण खूप वादळसदृश्य झाले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हर्णेमधीलच संदेश पटवा याची नौका त्याच ठिकाणी आली होती.
सदर नौकेला दिसताच क्षणी त्या नौकेने धाव घेऊन नौका बुडण्यापासून वाचवली आपल्याकडे असणाऱ्या साहित्याने नौका समुद्रात ओढून घेतली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. आताच्या परिस्थितीला सदरची नौका व सर्व खलाशी सुखरूप असून अजूनही सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळच नौका या बिघडलेल्या वातावरणात असल्याचे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button