
जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे १०१ वर्षी दुःखद निधन
रत्नागिरी जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे आज गुजरात जामनगर येथे दु: खद निधन झाले नुकताच त्यानी मार्चमध्ये आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला होता गेल्या काही वर्षांपासून त्या जामनगर येथील आपल्या मुलीच्या कडे राहत होत्या त्यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांनी दुःख व्यक्त केले आहे आशाताई पाथरे यानी १९४२ स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता त्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगला होता स्वातंत्र्यानंतरही त्यांनी अनेक सामाजिक कामात पुढाकार घेतला होता काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमात त्या हिरीरीने भाग घेत होत्या रत्नागिरी जिह्यात महिलांची पतपेढी सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यावेळी गोविंदराव निकम राजाभाऊ लिमये आदींच्या मार्गदर्शनाखाली त्यानी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला पतपेढी काँग्रेस भुवन च्या इमारतीत सुरू केली स्वातंत्र्यसैनिक असलेल्या आशाताई शेवटपर्यंत कार्यरत होत्या गेली काही वर्षे ते गुजरात येथे राहत होत्या त्यांच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्हा एका ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांला मुकला आहे
www.konkantoday.com