मरेपर्यंत लढेल, पण गुडगे टेकणार नाही-आमदार भास्कर जाधव

0
77

संघर्ष माझ्या पाचवीलाच पूजलेला आहे. तरी मी खचून जाणार नाही मला सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. माझ्यात लढण्याची क्षमता देवानेच दिली आहे. भास्कर जाधव मरेपर्यंत लढेल, पण गुडगे टेकणार नाही. कोकणच्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळा आहे. आता तुम्ही मतदारसंघ सांभाळा, मी जिल्ह्यातील सर्व आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

चिपळूण तालुक्यातील रामपूर गुढे फाटा येथे चैतन्य हॉल येथे गुहागर मतदार संघात येणाऱ्या चिपळूण तालुक्यातील 72 गावांचा आढावा भास्कर जाधव यांनी घेतला. यावेळी युवासेना कोअर कमिटी सदस्य व माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, उपजिल्हा प्रमुख रवींद्र सुर्वे, तालुका प्रमुख संदीप सावंत, उपतालुका प्रमुख संदीप चव्हाण व लक्ष्मण कोकमकर, माजी नगरसेवक फैसल कास्कर, उद्योजक वसंतशेठ उदेग, प्रभाकर जाधव, सुभाष जाधव, सुरेश साळवी, सुशीला पवार यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. तालुका प्रमुख संदीप सावंत व संदीप चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर कळंबट, रामपूर यापूर्ण जि. प. गटाचा तसेच खेर्डी, सावर्डे, कोकरे जि. प. गटातील गावांचा आढावा घेण्यात आला.पदाधिकाऱ्यांनी वाडीवर जाऊन सर्वाना सोबत घेऊन काम करा. गट तट न करता पक्षहीत डोळ्यासमोर ठेऊन काम करा. एखाद्याचा व्यक्तिगत माझ्यावर राग असेल परंतु पक्षांवर असणार नाही याची काळजी घ्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांना सहनुभूती आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. त्यामुळे मुस्लिम बांधव आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्र उद्धवजींच्या मागे उभा आहे. आज निवडणूक झाली तर मुंबई महानगर पालिकेसह आमदार व खासदारही शिवसेनेचे निवडून येतील. आज उध्वजींकडे पक्ष नाही, चिन्ह नाही तरीही 28 पक्षांच्या इंडिया आघाडीत त्यांचा सन्मान केला जातो, त्यांना आदराचे स्थान देतात कारण त्यांच्याकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार आहेत. देशात सत्ता आणताना उद्धव ठाकरे महत्वाचे आहेत. हे विरोधी पक्ष नेत्यांना समजले आहे. तुम्ही पाच पाच मते वेचा. लोकांजवळ बसा चर्चा करा, आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे त्या दृष्टीने तयारी करा, असे आवाहन जाधव यांनी केले.
www.konkantoday
.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here