‘कांचन डिजिटल’ तर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित

0
74

□ दिमाखदार सोहळ्यात पारितोषिक वितरण
□ मंगळागौर, गणेशवंदनाच्या सादरीकरणाने कार्यकमात बहार


घरगुती गणपतीच्या ठिकाणी वैविध्यपूर्ण ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक सामाजिक देखाव्यांचे सादरीकरण तसेच थक्क करणारी आकर्षक आरास यातून गणेशभक्तांच्या कलागुणांचा अविष्कारच. गणेशाप्रति अपार श्रध्दा आणि गणेशभक्तांच्या उत्साहाला दाद देताना रत्नागिरीतील ‘कांचन डिजिटल’ तर्फे आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेतील विजेते, विशेष उल्लेखनीय, उत्तेजनार्थ व प्रोत्साहनपर पारितोषिक विजेत्यांना मोठ्या दिमाखादार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ कांचन डिजिटलतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित तालुकास्तरीय घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच येथील श्री भैरव मंगल कार्यालय येथे पार पडला. या सोहळ्याला साधना मालगुंडकर, रत्नागिरी व्यापारी संघटना अध्यक्ष गणेश भिंगार्डे, उद्योजक गणेश धुरी, मनोज गुंदेचा, विजय खेडेकर, सुमित ओसवाल, भूपेश मोरे, शकील गव्हाणकर, निलेश नार्वेकर, कांचन डिजिटलचे सर्वेसर्वा व स्पर्धा आयोजक कांचन मालगुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेशभक्तांचा यंदा उदंड प्रतिसाद लाभलेल्या यावर्षीच्या स्पर्धेत तालुकाभरातील 110 या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यंदा वैविध्यपूर्ण ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक सामाजिक देखावे, तसेच आकर्षक आरास थक्क करणारी होती. अशा या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना या कार्यकमात सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक संदीप मेस्त्री- सडेवाडी, जयगड ( देखावा -चंद्रयान 3 ) यांना 12000/- रोख पारितोषिक, ट्रॉफी व फोटो पेम, द्वितीय क्रमांक – चारुदत्त धावलकर- ब्राह्मणवाडी गावखडी, (देखावा – मार्कंडेय ) यांना रु. 8000/- रोख पारितोषिक, ट्रॉफी व फोटो पेम, तृतीय क्रमांक अनंत साळवी- फणसोप ( देखावा – दशावतार ) यांना रु. 5000/- व ट्रॉफी व फोटो पेम देउन सन्मानित करण्यात आले.
या पारितोषिक वितरण सोहळ्याचे उद्घाटन दिपपज्वलन साधना मालगुंडकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशवंदना झाली. पुढे कार्यकमाचा प्रारंभ करताना सुरुवातीलाच रत्नागिरीतील पाच निवडक मंडळांचे मंगळागौर सादरीकरणाने अधिकच रंगत आणली. अभिलाषा ग्रुप, किरण डान्स अकॅडमी, रणरागिणी ग्रुप, कलाकृती ग्रुप, अतरंगी ग्रुप च्या महिलांनी मंगळागौर सादरीकरणाने उपस्थित साऱ्यांनाच मोहित केले. तर गणेश वंदना सादरीकरण ज्योती सचिन मोरे आणि सेजल मयेकर यांनी केले. या कार्यकमात सूत्रसंचालनाची जबाबदारी अनघा निकम-मगदूम यांनी सांभाळली.
या स्पर्धेला प्रायोजक रत्नागिरीचे प्रसिद्ध उद्योजक भैय्याशेठ तथा किरणशेठ सामंत, उद्योजक मुकेश गुंदेजा, प्रवीण जैन, राजू कीर, प्रसन्न आंबुलकर, कै. उमेश शेटे, गणेश भिंगार्डे, राजू घाग, दिलीप संघवीज, सुमित जैन, राजा शेठ मयेकर, भूपेश मोरे, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, दिलीप भाटकर यांनी प्रायोजकत्व दिले होते. त्यातील उपस्थित प्रयोजकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धेचे परीक्षण परीक्षक अभिजीत नांदगावकर, नरेंद्र जगन्नाथ पाटील, विजय पाडावे, विजय बासुतकर, अमृता मायनाक, शकील गव्हाणकर, अजिंक्य सनगरे, आदेश मयेकर आणि कांचन मालगुंडकर यांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेतील विशेष उल्लेखनीय स्पर्धकांमध्ये अनिल गोताड – (कोतवडे , गावणवाडी : देखावा- संत गोरोबा), अनिकेत सुपल (सह्याद्री नगर- नाचणे : देखावा – चंद्रयान), आशिष वाडकर ( मिरजोळे, देखावा- जेजुरी), मयूर भितळे ( सोमेश्वर, देखावा- समाजसेविका सिंधुताई सकपाळ) यांना प्रत्येकी 2000 रु. ट्रॉफी व प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ रमेश माचकर (सुतारवाडी शिरगाव, देखावा- गोवर्धन), श्रीपाद शिवलकर (बसणी-नागझरेवाडी, देखावा-सामाजिक संदेश), घाटक कुटुंबीय ( शेंडगेवाडी, पावस, देखावा- चंद्रयान) यांना प्रत्येकी रु. 500 व ट्रॉफी व प्रमाणपत्र) देउन सन्मानित करण्यात आले.
प्रोत्साहनपर पारितोषिक संतोष नेवरेकर (बसणी, देखावा- कालिया मर्दन), अर्जुन माचिवले (तरळ-माचीवलेवाडी, देखावा- वाचाल तर वाचाल), मंगेश घाणेकर (घाणेकर वाडी-नरबे, देखावा -जंगल), जीवन कोळवणकर ( उत्कर्ष नगर- कुवारबाव, देखावा- वराह अवतार), संजय वर्तक ( कुवारबाव, देखावा- देशभक्तीपर), सागर पुंभार (पुंभारवाडी, पावस, देखावा- निसर्ग देखावा), अजित साळवी (जुईवाडी, फणसोप, देखावा- कोळी गणपती), सागर चौगुले (काळबादेवी, देखावा- हिमालय), साईराज वाडकर (मिरजोळे, देखावा- राधाकृष्ण), रामदास झापडेकर ( कर्ला, देखावा- परशुराम भूमी वटपौर्णिमा ), राजेंद्र खानविलकर (रत्नागिरी, देखावा- कलाकुसर), साहिल शिवलकर (रत्नागिरी, देखावा- कलाकुसर), अवधूत सावंत (रत्नागिरी, देखावा- मोबाईलचे दुष्परिणाम), साईराज पोटफोडे, (रत्नागिरी, देखावा- नैसर्गिक), सचिन बेर्डे ( रत्नागिरी, देखवा- वारली पेंटिंग) यांनाही आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here