वासुदेव बनून आलेल्या ५ जणांना मारहाण केल्याप्रकरणी ७ जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडी येथे वासुदेव बनून आलेल्या ५ जणांना मारहाण केल्याप्रकरणी कुंभारवाडी व पिंगुळी येथील ७ जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्याचे समजतात कुडाळ पोलीस ठाण्यात वाडीवरवडे, पिंगुळी, कुडाळ कुंभारवाडी येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.वासुदेव बनून आलेल्या बारामतीतील ५ जणांनी वाडीवरवडे, पिंगुळी, कुडाळ कुंभारवाडी येथे अनेकांची फसवणूक करून त्यांच्याकडून रक्कमा घेतल्या होत्या आणि याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात वाडीवरवडे येथील महेश धुरी यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर फसवणूक करणाऱ्या बारामती येथील ५ जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी ५ जणांना २ दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान फसवणूक करणाऱ्या या पाच जणांना मारहाण केली म्हणून पिंगुळी व कुडाळ येथील ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com