
रत्नागिरी शहरात 1 लाख रुपयांच्या ब्राऊन हेरॉईन अंमली पदार्थासह शहर पोलिसांनी केली एकाला अटक
रत्नागिरी शहरात 1 लाख रुपयांच्या ब्राऊन हेरॉईन अंमली पदार्थासह शहर पोलिसांनी एकाला अटक केली असून आरोपीचे नाव
अरमान लियाकत धामस्कर असे आहे
हि कारवाई गुरुवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.55 वा. चर्मालय ते साळवीस्टॉप जाणाऱ्या रस्त्यावरील मोकाशी बियर शॉपजवळ करण्यात आली.संशयितकडून रोख रक्कम आणि दुचाकीसह एकूण 1 लाख 51 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अरमान लियाकत धामस्कर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.गुरुवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.55 वा. चर्मालय ते साळवीस्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर शहर पोलीसांना संशयिताकडे ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थच्या 155 कागदी पुड्या मिळून आल्या. पोलिसांनी अरमानची चौकशी केल्यावर त्याने विक्रीसाठी हा अंमली पदार्थ आणल्याचे मान्य केले. त्याच्याकडून रोख 1 हजार 200 रुपये आणि 50 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 1 लाख 51 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
www.konkantoday.com