कोकण रेल्वे मार्गावरील यापूर्वी रद्द केलेल्या गाड्यांमध्ये आणखी चार गाड्यांची भर
पनवेलनजीक मालगाडीला झालेल्या विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी सायंकाळी हळुहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे तरीदेखील कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास काही कालावधी लागत आहे युद्ध पातळीवर काम करून मालगाडी घसरलेल्या ठिकाणचा मार्ग दुरुस्त झाला असला तरी अजूनही वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील आणखी चार गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील यापूर्वी रद्द केलेल्या गाड्यांमध्ये आणखी चार गाड्यांची भर पडली आहे. त्यामध्ये दिवा ते चिपळूण मेमू (01155), दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी मंगळूर एक्सप्रेस, तसेच मुंबई सीएसएमटी मडगाव ही दि. ऑक्टोबर २ ऑक्टोबरची ची गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
www.konkantoday.com