
वादामुळे अडकलेल्या कोकणातील रत्नागिरीत होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पाचे तीन तुकडे होण्याची शक्यता
कोकणातील रत्नागिरीत होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पाचे त्रिभाजन करून त्यापैकी एक युनिट विदर्भात उभारले जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी विदर्भ इकॉनाॅमिक डेव्हलपेंट कौन्सिल (वेद)च्या शिष्टमंडळाशी बाेलताना दिले.परिणामी, बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला नवे वळण मिळाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्री पुरी यांच्यासमोर वेदने विदर्भात रिफायनरी प्रकल्प उभारण्याविषयी सादरीकरण केले. अंदाजे चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पाची क्षमता वर्षाला ६० दशलक्ष टन (एमटीपीए) आहे. स्थानिक पातळीवर होणारा विरोध लक्षात घेता त्या प्रकल्पाचे प्रत्येकी २० एमटीपीए क्षमतेचे तीन भाग करून त्यापैकी प्रत्येकी एक युनिट रत्नागिरी व नागपूर येथे उभारण्याबाबत विचार होऊ शकेल, असे ना. पुरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी वेदचे कोषाध्यक्ष नवीन मालेकर, जे. एस. साळवे, चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा उपस्थित होते.
www.konkantoday.com