शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत किल्ल्यांची स्वच्छता मोहीम


*रत्नागिरी, : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्ताने 10 ते 11 वाजता मांडवी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास उपक्रमाबाबत गड किल्ले परिसर स्वच्छता अभियानांतर्गत रत्नदुर्ग व जयगड या किल्ल्यामंधील परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button