आरोग्य वर्धीनी आरोग्य केंद्र मालगुंड येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा संपन्न गणपतीपुळे च्या सरपंच कल्पना पकये यांचे हस्ते उद्घाटन
शासनाचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम राज्यात सर्वत्र साजरा होत आहे. या कार्यक्रमाच्या आरोग्य मेळा या उपक्रमाचे उद्घाटन आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत गणपतीपुळे च्या सरपंच कल्पना पकये यांच्या हस्ते तर मालगुंड तंटामुक्त समिती चे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी कार्यक्रम बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व सहा राष्ट्रीय कार्यक्रमांना केंद्र स्थानी ठेऊन डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असल्या बाबत तसेच या आठवड्यात क्षय रोग व कुष्ठ रुग्णांचे तपासणी व उपचार यावर भर देण्या संबंधी व सन 2027 पर्यंत टिबी मुक्त भारत करण्याची मोहीम असल्या बाबत उपस्थितांना सांगण्यात आले या वेळी उपस्थितांची तपासणी, मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात आले. आयुष्यमान भव कार्यक्रम अंतर्गत स्वच्छ्ता मोहीम, आयुष्यमान सभा, आभा आयडी, आयुष्यमान कार्ड, मातृ वंदना योजना माहिती, हिवताप, मानसिक आरोग्य सेवा, आरोग्य विषयक समुपदेशन व सल्ला या बाबी चा समावेश करून प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत सर्व आरोग्य उपकेंद्र येथे हे उपक्रम राबविले जाणार आहेत त्या साठी नागरिकांनी सहकार्य करणे असे आरोग्य केंद्र मालगुंड चे आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी नागरिकांना आवाहन केले. वा वेळी आरोग्य सहाय्यक श्री. बारिगे आरोग्य सहाय्यक महिला श्रीमती सखरका, श्री. पाटकुळकर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आशा सेविका उपाठीत होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. निवेंडकर यांनी केले व उपस्थितांची आभार ही व्यक्त केले .