नवनिर्वाचित खासदार श्री सुनील तटकरे यांचे गुहागर येथे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले

रायगड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे हे निवडून आल्यानंतर आज प्रथमच मा. आ. श्री. भास्करराव जाधव यांच्या गुहागरमध्ये आले असता त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. गुहागर शहारातून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर गुहागर शहरातील भंडारी हॉलमध्ये मा. श्री. तटकरे आणि श्री. भास्करराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दापोलीचे आमदार श्री. संजयराव कदम, जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते श्री. विक्रांत जाधव यांच्यासह मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button