
कुवारबाव परिसर नागरिक संघातर्फे 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिन
रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रविवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता येथील ज्येष्ठ नागरिक भवनात ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे यावेळी सप्टेंबर 2023 मध्ये वाढदिवस असणाऱ्या सदस्यांचे सत्कार करण्यात येणार आहेत तरी ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांनी केले आहे
www.konkantoday.com