
रमेश कीर कोकण पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसतर्फे समन्वयक
कोकण पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम कोकण विभागात प्रभावीपणे राबविण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांची समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निश्चय केलेला दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून मतदार याद्यांचा कार्यक्रम कोकण विभागात प्रभावीपणे राबविण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांची समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने ही निवड जाहीर केली आहे. रमेश कीर यांनी कोकण म्हाडाचे सभापती, रत्नागिरी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा प्रभारी तसेच प्रदेश चिटणीस म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.
www.konkantoday.com