
गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत पारंपारिक वेशभूषा ठरली लक्ष्यवेधी कांचन डिजिटल तर्फे रत्नागिरीत आयोजन ; हिंदू संस्कृतीचे घडले दर्शन.
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा या निमित्त रत्नागिरीत काढल्या जाणाऱ्या भव्य स्वागत यात्रेच्या निमित्ताने येथील प्रसिद्ध कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ च्या माध्यमातून पारंपारिक वेशभूषा स्पर्धा लक्षवेधी ठरली. एकापेक्षा अनेक आकर्षक आणि सरस अशा पारंपरिक वेशभूषेने साऱ्यांनाच खिळवून ठेवले. लक्षवेधी ठरलेल्या स्पर्धकांना आकर्षक सन्माचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कांचन डिजिटल रत्नागिरी यांच्यावतीने ही पारंपरिक वेशभूषा स्पर्धा रविवारी गुढीपाडव्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने घेण्यात आली होती. सर्व वयोगटासाठी ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्वच वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

रत्नागिरी शहरात काढलेल्या भव्य स्वागत यात्रेत स्पर्धकांच्या आकर्षक वेशभेषेने साऱ्यांनाच मोहित केले. सहभागी स्पर्धकांतून उत्कृष्ट वेशभूषा धारण करणाऱ्यांचे परीक्षण कांचन डिजिटल परिवारातील सदस्यांनी केले. ही शोभायात्रा संपल्यानंतर लगेचच उत्कृष्ट निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात सन्मानित करण्यात आले. त्यावेळी श्री देव भैरी देवस्थान चे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे, माजी आमदार राजन साळवी, बाबा देसाई, उन्मेष शिंदे,उद्योजक मुकेश गुंदेजा, सामाजिक कार्यकर्ते विजय खेडेकर, सुधाकर सावंत, कॅप्टन दिलीप भाटकर, राजेश आयरे, भानुषाली, साईजित शिवलकर, दीपक सुर्वे आणि कांचन मालगुंडकर सह कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ चे सर्व सदस्य उपस्थित होते.

या स्पर्धेत लहान गट चार सन्मान चिन्ह या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यामध्ये दियांश शिंदे, शांभवी एकेळ, विघ्नेश सनगरे, आणि प्रभू श्री रामचंद्र देखावा = देसाई, जोशी, घोटे यांचा समावेश आहे. तर मोठा गट स्त्रीवर्ग- राधा देवळे, रुची साळवी, रिया गांधी. मोठा गट पुरुष – नकुल नाडकर्णी, योगेश राईका, रुपेश पेडणेकर या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ कडून गौरविण्यात आले