
रत्नागिरीचे माजी नगरसेवक बंटी किर यांचा ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेशरत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का
रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक बंटी किर यांनी आज राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. बंटी किर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होते. त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत बंटी किर यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, जिल्हा महिला संघटक शिल्पा सुर्वे, प्रशांत सुर्वे, तालुका प्रमुख बाबू म्हाप, सौरभ मलूष्टे, माजी नगरसेवक निमेश नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com