
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 581 शाळा बंद होणार या अफवा -मंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 581 शाळा बंद होणार, हे चुकीची माहिती आहे. एकही शाळा बंद होणार नाही, शाळा बंद होणार आणि बारना परवानगी देणार, अशा अफवा पसरवली जात आहे. ही अफवा कोण पसरवतो माहित नाही, अशा अफवा पसरवू नये, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केले. सावंतवाडी दौऱ्यावर आले होते
ते पुढे म्हणाले की, शाळेबाबतचा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण शाळेमध्ये किती मुले आहेत. त्यांना चांगले शिक्षण देता येण्याकरिता हा सर्व्हे आहे. एका शाळेमध्ये दोन तीन मुले असतील तर ती एकत्र खेळूही शकत नाहीत.
बऱ्याचशा कंपनीचा सीएसआर निधी आरोग्य किंवा शिक्षणावर खर्च करतात. हे सर्व पैसे एनजीओकडे जातात, मग ते शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करतात, याचा कुठलाही फायदा विद्यार्थ्यांना होत नाही, त्यामुळे या पैशाचा वापर जुन्या झालेल्या शाळांच्या दुरुस्ती तसेच विविध शाळांच्या कामांसाठी कंपन्या देऊ शकतात, यासाठी सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा बंद होणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असून कोणताही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले
www.konkantoday.com