सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येसहा कोटी रुपये किमतीची वेळ माशाची उलटी पकडली, नगरसेवकासह चौघाना अटक

0
69

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी वन विभागाने जप्त केली आहे.व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत सहा कोटी रुपये असल्याचं समजतं. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये महाबळेश्वरमधील एका नगरसेवकाचाही समावेश आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलो एक कोटी रुपये दराने व्हेल माशाची उलटी विकली जाते. मात्र, तिच्या विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे तिची तस्करी सुरु असते. व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. साताऱ्यातील मेढा-महाबळेश्वर रोडवर कारवाई करत ही उलटी जप्त करण्यात आली. पोलिसांनी पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतलं. जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडे सहा किलो असून त्याची किंमत साडे सहा कोटी आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here