शिंक्याचे तुटेल आणि बोक्याचे फावेल’ अस काही होणार नाही-भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार आणि तीन लाख पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होणार ही काळ्या दगडावरील कोरलेली रेघ आहे.असे भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले आहे.
मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा शिवसेना लढवणार असे विधान केल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हे विधान केले असल्याने त्याला महत्व आले आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रवास योजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली नव्हती. देशात १६० जागा या लोकसभा प्रवास मध्ये समाविष्ट आहेत ज्या भाजप एक किंवा दोन वेळा विजयी झालेल्या जागा आहेत.त्या जागा लढून विजयी होण्याचा संकल्प केला आहे आणि त्या दृष्टीने गेली पाच वर्षे आम्ही या मतदासंघात काम केले आहे.त्यामुळे ही लोकसभा भाजप युती मध्ये कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले आहे.
खासदार विनायक राऊत यांनी २०१९ मध्ये युतीसोबत लढून विजयी होऊन सुद्धा युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी युतीबाबत भाष्य करू नयेत.त्यामुळे ‘शिंक्याचे तुटेल आणी बोक्याचे फावेल’ अस काही होणार नाही आणी त्या भ्रमात पण विनायक राऊत यांनी राहू नये. असा टोला राऊताना लगावला आहे. भाजप व शिवसेना जागावाटपाबाबत योग्य निर्णय घेतील. त्यामुळे विनायक राऊत आणि उगाचच आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सुनावले.
www.konkantoday.com