
सीएनजी भरण्यासाठी चाकरमान्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा
कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवासाठी चाकरमानीआले होते सध्या अनेकांची वाहने सीएनजी वर आहेत मात्र या चाकरमान्यांना जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीएनजी मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला आहे
चिपळूण इथल्या पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासासाठी गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर या वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत. गॅस भरण्यासाठी विलंब होत असल्याने चाकरमान्यांनाचा परतीचा प्रवास देखील लांबत आहे. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत आहे. याशिवाय काही चाकरमाने आंबा घाटा मार्गे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निघाले आहेत तेथे देखील सीएनजी पंपावर मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या आहेत
www.konkantoday.com