सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माळीच्या घरात सुमारे ८० कुटुंबीयांचा गणपती
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माळीच्या घरात सुमारे ८० कुटुंबीयांचा गणपती पूजला जातो. सुमारे सातशे वर्षांहूनही अधिक काळाची परंपरा या गणेशोत्सवाला आहे.गावातील राऊळ कुटुंबीयांनी आजही या एकत्रित गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने जपली आहे.
सोनुर्ली गावच्या ग्रामदेवता परिवारातील श्री देवी माऊलीसह मळगाव येथील श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ, श्री देव मायापूर्वचारी, श्री देव दोन पूर्वस या चार देवस्थानांसह गावातील पाचवे देवस्थान म्हणून माळीचे घराची ओळख आहे. याबरोबरच एकत्रित कुटुंबाच्या गणेशोत्सवासाठीही हे घर गेल्या सातशे वर्षांपासून प्रसिद्ध आहे. राऊळ कुटुंबीयांकडून करण्यात येणारी गणेशोत्सवाची पूर्वतयारी, गणेशोत्सव कालावधीतील भक्तिमय कार्यक्रम हे भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचा उत्तम दाखला आहे. ग्राम परिवारातील हे पाचवे देवस्थान माळीच्या घरातील मानकऱ्यांनी, सर्व राऊळ कुटुंबीयांनी मनाच्या अंतर्भावाने व जागरूकतेने जोपासले आहे. सावंतवाडी शहराच्या पश्चिम सीमेला लागून असणारे मळगाव हे गाव येथील रेल्वे स्थानकामुळे देशाच्या नकाशावर रेखाटले आहे
www.konkantoday.com