तीन विभागांच्या भरतीतून सरकारच्या तिजोरीमध्ये अंदाजे २६६ कोटी रुपयांचे शुल्क जमा
देशाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून ७५ हजारांची मेगाभरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये तलाठी (महसूल), जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया पार पडतेय. यासाठी लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आहेत. प्रत्येक भरतीसाठी रिक्त जागांच्या तुलनेत उमेदवारांच्या अर्जांची संख्या किमान तिप्पट ते पाचपट पहायला मिळत आहे. त्यामुळे अगदी काही हजार जागांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रत्येक अर्जासाठी राज्य शुल्क भरावे लागते. प्रत्येक भरतीसाठी खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. तर मागासवर्गीय उमेदवारांना अर्जासाठी ९०० रुपयांचे शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे या तीन विभागांच्या भरतीतून सरकारच्या तिजोरीमध्ये अंदाजे २६६ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. www.konkantoday.com